I'm Vishal and I love to read StoryMirror contents.
Share with friendsभर पाऊसात समुद्र हि आटलाय, मोकळ्या आकाशात जीव गुदमरलाय. भर पौर्णिमेचा चंद्र हि अंधारलाय, चांदन्यानी तर जणू सुड उगवलाय. अवघ विश्व मुठीत चुरगळलय, जग हरवलंय तेंव्हा कुठं जीवन सापडलंय.
बाहेर सैरभैर, आत अंधार. ना स्वप्न, ना आशा, ना राग ना लोभ. हरवण्यासाठी काही नव्हतं, कमावण्याची हौस नाही. आहे ती फक्त हुरहूर अंतरंगातील क्षितीजाची.